हर्सूल तलावातून पिण्याचे पाणी सोडण्याची मनपाकडून तयारी सुरू

Foto
यावर्षी हर्सूल तलाव परिसरात चांगला पाऊस पडला. आज हर्सूल तलावात तब्बल 27 फूट पाणी आले आहे. गतवर्षी तलावात फक्‍त 12 फूट पाणी असल्याने पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले नव्हते. यंदा मात्र पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असताना तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने जुन्या शहरातील 16 वॉर्डांमधील नागरिकांना पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे.  रोजाबागेतील गोमुख येथील फिल्टर केंद्रात दुरुस्तीची कामे सुरू झाली आहे. 
 निजाम राजवटीत औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 1956 साली हा तलाव उभारण्यात आला होता. त्यावेळी शहराची लोकसंख्या मर्यादीत होती. त्यामुळे तलावातील पाण्याच्या पुरवठा शहरासाठी केला जात होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून दिवसेंदिवस पाऊस कमी पडत आहे. 2018 मध्ये 18 फूट पाणी होती. त्यामुळे काही महिने तलावातून पाणी पुरवठा केले गेले. गतवर्षी 2019 मध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला. तलावात फक्‍त 12 फूट पाणी होते. त्यामुळे परिसराीतील नागरिकांनी तलावातून पाणी पुरवठा करण्यात येऊ नये, अशी मागणही केली होती. त्यामुळे पाणी पुरवठा केला नव्हता. पण यावर्षी हर्सूल तलावात शंभर टक्के पाणी भरले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनातर्फे तलावातून ळपाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. रोजाबाग येथील फिल्टर केंद्रावर व्हॉल्वची दुरुस्ती, हौदाची साफसफाई आदी कामे सुरू करण्यात आली आहेत
8 हर्सूल तलावातील पाणी जुन्या शहराला सोडण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज रोजाबाग गोमुख येथील पाणी फिल्टर केंद्रावर मनपातर्फे दुरुस्ती व साफसफाईचे काम सुरू आहे. (छाया ः मंगेश शिंदे)